न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- आऊट गोईंगला मी परिवर्तन असे म्हणतो. या घटनांमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसून येतीलच, राज्यात वेगळे चित्र असेल.
शिवस्वराज्य यात्रा ही नंतर सुचलेली नाही. काहीजण अगोदर यात्रा काढतात व नंतर त्यात यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा सूर निघतो, तर दुसऱ्या यात्रेत पुन्हा मी येईल असे मुख्यमंत्री म्हणत आहेत, असे खा. अमोल कोल्हे पत्रकारांशी बोलताना शिवसेना आणि भाजपावर टीका करताना म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, तिसरी शिवस्वराज्य यात्रा मात्र महाराजांचा सर्वसामान्य मावळा काढतो आहे, जो या स्पर्धेत कुठेही नाही. मला खुर्ची हवी म्हणून मी यात्रा काढत नाही, रयतेचे राज्य यावे यासाठी ही यात्रा काढत असल्याचे खासदार कोल्हे म्हणाले.















