न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ‘आरोग्य ही सेवा’ मोहिमे अंतर्गत प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलन व जनजागृतीसाठी प्रभात फेरीसह पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलनासाठी आज सकाळी काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीमध्ये नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू कन्याशाळा क्र. २ च्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण ही त्यांनी केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलन व जनजागृतीपर विविध उपक्रम घेण्याचे निर्देश दिले असून त्या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘क’ क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे व आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, मुख्याध्यापिका बी.डी. गिरी, एम.एम. जगताप,मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एन. भोसले, आरोग्य निरीक्षक अंकुश धीटे, सुनील गायकवाड, विक्रम सवदे, महादू जाधव आदी सहभागी झाले होते. तसेच नेहरूनगर परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेवून प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलनचा निर्धार व्यक्त केला.












