न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- जखमी वासरु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सोडून बजरंग दलाने आंदोलन केलं. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरं, गायी, गुरांचा प्रश्न मांडण्यात आला. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्याचमुळे आज शनिवारी (दि. २१) रोजी निषेध नोंदवत हे आंदोलन करण्यात आलं, असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
एका मोटारीच्या डिक्कीमधून हे वासरु आणले गेले. त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर या वासराला बसवून बजरंग दलाने आंदोलन केले. वासराच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली होती मात्र, ते घाबरले होते.












