न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण :- मानिनी फाउंडेशनच्या वतीने भारती चव्हाण यांनी प्राधिकरणाने नियोजित भूखंड वाटपामध्ये महिलांना प्राधान्य द्यावे, जेणेकरून शहरातील महिला उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनतील व महिलांचा आर्थिक, सामाजिक विकास होईल, असे निवेदन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
यात नियोजित भूखंड वाटपामध्ये महिला सामाजिक संस्थाना ५० टक्के आरक्षण द्यावे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ६० टक्के महिलांची संख्या आहे. अनेक महिला सामाजिक संस्था शहरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रात महिलांकरीता कार्य
करतात, अशा संस्थाना भूखंड वाटपामध्ये आरक्षण देऊन प्राधान्य दिल्यास या संस्था महिलांसाठी भरीव कार्य करू शकतात, त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यासाठी मदतच होईल असे निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
यावेळी भारती चव्हाण, सुषमा असलेकर, कल्याणी कोटुकर, वैशाली फडके, यशश्री आचार्य, अनुषा फडके, संगीता जाधव आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.











