न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०१९) :- बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त असा एकूण ३० हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
विकास नंदकुमार गायकवाड (वय ३२, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय दीपक दौंडकर यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, एक संशयित संतनगर सिग्नल जवळील बसस्टॉपजवळ थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून विकास याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३० हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी विकास याला अटक करून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












