न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांचे आज (गुरुवारी) पहाटे अल्पशा आजारने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २००७ साली झालेल्या निवडणुकीत वाघ शिवसेनेकडून निवडून आले होते. चिंचवड, बिजलीनगर प्रभागाचे त्यांनी महापालिकेत नेतृत्व केले.
निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिजलीनजर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.












