न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरीतील पवना नदी पात्रातील शुभाषनगर घाट येथे अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आज मंगळवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान आढळून आला.
घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. नदीच्या प्रवाहातून हा मृतदेह वाहत आल्याची अथवा तो तेथे कोणी तरी आणून टाकला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.