न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑक्टोबर २०१९) :- काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व LBT ENGLISH MEDIUM SCHOOL यांच्या संयुक्त विदयमाने शाळेच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहाद्दुर शास्ञी यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली त्यासोबत २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती अभियान, मतदान करणारच, असा संकल्प शपथविधी राबविण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर (मा.विरोधी पक्षनेते पिंचिंमनपा) यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहाद्दुर शास्ञी प्रतिमेची पुजा करण्यात आली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर (अध्यक्ष- ओम साई ग्रुप) प्रमुख उपस्थिती राजूशेठ पवार (जेष्ठ संचालक-शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ) हे होते. यावेळी अनिता तापकीर (मा. नगरसेविका पिंचिंमनपा), संस्थेचे सचिव सागर तापकीर, शिवाजी तेलंगे (जेष्ठ संचालक-शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ) शेळके मामा (सामाजिक कार्यकर्ते) कय्युम शेख (सामाजिक कार्यकर्ते) हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेषभुषा करुन आले होते. सोबत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भाषणे केले.
कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत वाखारे सर (मुख्याध्यापक-श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विदयालय काळेवाडी) सुञसंचालन बल्लाळ सर यांनी केले तर आभार देव सर यांनी मानले.