न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ ऑक्टोबर २०१९) :- नवरात्र महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातील महिला पारंपारिक पद्धतीने भोंडल्याचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जी एम आय कन्या शाळेत भोंडल्याचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुण्या अॅड. लायन शोभा कदम, शालेय समितीचे अध्यक्ष सूरजभान आगरवाल, सदस्य रमेश आवस्थे, पालक प्रतिनिधी कैलास टोणपे, मुख्याध्यापिका साधना को-हाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनंदा चपटे व अनुजा कांबळे तसेच शिक्षक प्रतिनिधी मोहन चार्य व शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी नितीन निंबाळकर यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर अनिता झांबरे आणि वैशाली वाघ यांनी श्रीसुत्त सादर केले . उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका साधना को-हाळे यांनी केले.
संगीत शिक्षिका प्रज्ञा इंगळे यांच्यासह सर्व विद्यार्थिनींनी भोंडल्याची गाणी म्हणत सर्व मुलींनी फेर धरला . याप्रसंगी विद्यार्थिनींनी गरबा व रास दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. यामध्ये मुख्याध्यापिका साधना को-हाळे, प्रमुख पाहुण्या अॅड लायन शोभा कदम प्रियवंदा थोरात, ज्योती सातपुते यांच्यासह अनेक शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुजा कांबळे यांनी तर आभाराचे काम सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनंदा चपटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वैशाली वाघ यांनी करून दिला. मुलींना खिरापत देऊन भोंडल्याची सांगता झाली.