न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार, माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या महिला रणरागिनी म्हटल्या जाणाऱ्या महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या पुढे सरसावल्या आहेत.
संपूर्ण भोसरी मतदार संघ या महिला रणरागिनी विलास लांडे यांच्या प्रचारार्थ पिंजून काढत आहे. भयमुक्त भोसरी विधानसभा मतदारसंघ तसेच विकसनशील मतदार संघ करण्यावर आपला भर असणार असल्याचे विलास लांडे यांनी यापूर्वीच सांगितले असल्याने, सर्व महिला, पदाधिकारी, कार्यकर्त्या या मतदार संघात ठीक- ठिकाणी विलास लांडे यांना आमदार करण्यासाठी मतदारांना सांगत आहे.
तसेच भोसरी विधानसभा मतदार संघाचा विकसनशील अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम या महिला रणरागिनी करीत आहेत.


















