न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी व चिंचवड या दोन्ही मतदारसंघात प्रमुख विरोधी हे अपक्ष उमेदवार आहेत. यात चिंचवड मधून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे असून त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान आहे.
तर भोसरी मतदारसंघात महाआघाडी पुरस्कुत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे आहेत. त्यांच्यापुढे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांचे आव्हान आहे.

आज उमेदवारी माघार घेण्याचा अंतिम दिनांक होता. त्यामुळे आजच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. विलास लांडे यांना निवडणूक चिन्ह कपबशी मिळाली आहे. तर, राहुल कलाटे यांना निवडणूक आयोगाच्या वतीने बॅट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे आता उर्वरित १५ दिवसांत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविणे हे कठीण काम या दोघांना यशस्वीपणे मतदारांपुढे न्यावे लागेल. जेणेकरून त्याच्या गळ्यात यशाची माळ पडेल.


















