वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांना विश्वास
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदार संघात चमत्कार होणार असून वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड हे नक्की विजयी होणार असल्याचा दावा वंचित आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी व्यक्त केला आहे.
तायडे पुढे म्हणाले की “पिंपरी मतदार संघ बहुजनांचे वर्चस्व असलेला मतदार संघ आहे. यापूर्वीच्या दोन्हीही आमदारांनी मतदारांची फसवणूक केली आहे. फक्त सत्ता भोगण्याचे काम केले. यावेळी पिंपरीत चमत्कार होणार असून वंचित आघाडीचे प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड हे नक्की विजयी होणार आहेत.
प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड हे शेतकरी कुटुंबातील उमेदवार असून समाजासाठी काम करण्याची त्यांची तळमळ पाहूनच प्रकाश आंबेडकरांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. मतदार संघातील तरुण कार्यकर्त्यांची त्यांच्या मागे मोठी फळी आहे, त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे.


















