मोरे वस्तीतील मतदारांचा कोपरा सभेत निर्धार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. ११) रोजी प्रभाग क्रमांक १, चिखलीतील मोरे वस्ती येथे कामगार नेते सचिनभैया लांडगे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या उपस्थितीत कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कामगार नेते सचिनभैया लांडगे म्हणाले की, या परिसरातील मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद आमदार महेशदादा लांडगे यांना नेहमीच मिळतो. मागील पाच वर्षात महेशदादांनी आमदार निधीतून व महापालिकेच्या माध्यमातून या मतदारसंघात मोठी कामे मार्गी लावली. त्याच कामांमुळेच दादांना मतदारांचा पाठींबा मिळत आहे. पुढील काळात प्रलंबित कामे मार्गी लावू. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारराजांचा पाठींबा महेशदादांच्या पाठीशी राहू द्या. पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्याला व दादांना मंत्रीमंडळात पाठविण्यासाठी मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन लांडगे यांनी मतदारांना केले.
युवा नेते पांडाभाऊ साने प्रास्ताविकात म्हणाले की, आपल्या मतदारसंघाला महेशदादांच्या रूपाने उत्तुंग नेतृत्व लाभले आहे. दादांच्या दूरदृष्टीमुळे भोसरी मतदारसंघात सफारी पार्क सारखे आंतरराष्ट्रीय उद्यान उदयास येत आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा कायापालटच होणार आहे. आघाडी सरकारच्या काळातील अनेक प्रलंबित प्रश्न दादांनी मार्गी लावले आहेत. आपल्या शेजारी होणाऱ्या कचराकोंड्याला दादांनी पुण्यात पिटाळून लावले. सर्वसामांन्यांचा ध्यास जपणाऱ्या आपल्या लाडक्या नेतृत्वाला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवायचे आहे. आपला प्रभागाचा क्रमांक एक आहे. त्यामुळे दादांना आपण मताधिक्याच्या बाबतीतही नंबर एकलाच आणू. त्यासाठी येत्या २१ तारखेला आपल्या प्रभागातील सर्व मतदारांनी कमळापुढील बटन दाबून दादांना विजयी करण्याचा निर्धार करावा.
या कोपरा सभेस कामगार नेते सचीन भैया लांडगे, युवा नेते पांडाभाऊ साने, नगरसेवक कुंदन गायकवाड, स्वी.नगरसेवक दिनेश यादव, संतोष मोरे, मा. नगरसेवक सुरेश म्हेत्रे, मा. नगरसेवक गिताराम मोरे, मा. नगरसेवक सुनिल लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मळेकर, लालासाहेब मोरे, संजय मोरे, अमृत सोणवणे, जितुभाऊ यादव, दत्तात्रय कोरडे, नेताजी काशीद, तुकाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते अजय साने, ज्ञानेश्वर म्हांबरे, कपिल फलके, किसन बावकर व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















