न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०१९) :- विधानसभा निडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात शहरातील मातंग समाज भाजप- शिवसेना- रिपाई -रासप- शिवसंग्राम संघटना -रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी आहे. समाजातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी मतदारांना पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निगडीमध्ये समाजातील पदाधिका-यांची बैठक शुक्रवारी (दि.18) पार पडली. यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, बापू घोलप, सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले, भानुदास नेटके, सागर गायकवाड, सचिन कुचेकर, कोमल शिंदे, अमोल कुचेकर, राजू आवळे, दिनकर तेलंग, शेखर साळवी, मनोज तोरडमल, रमेश शिंदे, अविनाश कांबीकर, महेश खिलारे, गणेश आढागळे, धर्मेंद्र क्षिरसागर, अनिल सौंदडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, शहरात चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण जगताप, भोसरी मतदारसंघात महेश लांडगे आणि पिंपरी मतदारसंघात गौतम चाबुकस्वार आहे. महायुतीच्या माध्यमातून आणि आमदार म्हणून काम करत असताना या तिघांनी समाजासाठी विविध कामे केली. विविध योजना राबविण्यासाठी मदत केली आहे. तर, भारतीय जनता पक्षाने मातंग समाजासाठी विविध कामे केली आहे. आवाहन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला पुन्हा उभारी दिली. त्या माध्यमातून समाजाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम महामंडळ आणि सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम यापुढे सुरू राहावे आणि समाजाच्या हिताचे निर्णय व्हावेत. यासाठी शहरातील, तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवरांना विजयी करण्यासाठी मातंग समाजाने त्यांच्या पाठिशी उभे राहावे, असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.












