न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- भारतीय मजदूर संघाचे प्रदेश व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे सरचिटणीस अनिल ढुमणे यांच्या शिष्टमंळाने सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकरिता मुखमंञी देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत ४५ मिनिटे चर्चेदरम्यान १४ सुरक्षा रक्षक मंडळाचे एकञीकरण व १८८१ सुरक्षा रक्षक कायदा बदल या व अशा विविध मागण्यां संदर्भात चर्चा करण्यात आली.
लवकरात लवकर १४ मंडळांचे एकञीकरण करणार, पगार वेळेवर होण्यासाठी कॅबिनेट मीटिंग मध्ये चर्चा करणार, तसेच सुरक्षा रक्षक यांना चांगले दिवस आले पाहिजेत याकरिता शासनाच्या माध्यमातून महासंघाच्या मागण्या सोडावण्याकरीता प्रयत्न करणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासंघाच्या शिष्टमंळांस यावेळी दिले.