न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०१९) :- डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, ओ पी डी क्र -३, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे शल्य विभागामार्फत जागतिक मूळव्याध दिनानिमित्त ११ ते २३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत विशेष मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराची वेळ स. ९ ते दु. ४ वा .पर्यंत. रविवारी रुग्णालय बंद राहील. या शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला यांच्या तर्फे करण्यात आले आहे.