न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०१९) :- भूतकाळात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून पुरस्कार दिले जातात. ज्येष्ठांना दिलेल्या पुरस्काराने शेकडो तरुणांना प्रेरणा मिळते, असेच प्रेरणादायी ध्येय बाळगणारे तरुण इतिहास घडवितात. कुस्तीच्या खेळाने राज्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदविले आहे. कुस्ती शौकीनांना व पैलवानांना अभिमान वाटेल असे अत्याधुनिक अद्यावत कुस्ती क्रिडा संकुल आगामी दोन तीन वर्षात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या नेतृत्वाखाली उभारले जाईल. त्याचे नियोजन सुरु आहे असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी रहाटणी येथे केले.
रहाटणी येथे महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धेत प्रथमच अत्याधुनिक स्कोअर बोर्ड, लेझर शोचा वापर करण्यात आला. ज्येष्ठ कुस्ती निवेदक पै. शंकर अण्णा पुजारी यांनी प्रथमच निवड चाचणी स्पर्धेत निवेदन केले. कुस्ती स्पर्धा कशी असावी, हे आयोजक संदिप भानुदास नखाते यांनी ज्येष्ठ व तरुणांचा उत्तम समन्वय साधून दाखवून दिले आहे. या स्पर्धेत शहरातील 300 स्पर्धक सहभागी झाले आणि १४७ कुस्त्या झाल्या. शहरात कुस्ती शौकिन व कुस्तीला पाठबळ देणा-यांची संख्या वाढली आहे असे दिसते. असे आ. जगताप यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ६३ वे अधिवेशन आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जानेवारी २०२० मध्ये श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणार आहे. त्या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व वस्ताद विष्णूबुवा नखाते प्रतिष्ठान आयोजित समाज भूषण हभप नारायण विष्णूबुवा नखाते जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी स्पर्धा २०१९ रहाटणी येथे मंगळवारी (दि. २४) ‘ड’ प्रभागचे स्विकृत सदस्य संदिप भानुदास नखाते आणि समस्त ग्रामस्थ रहाटणी गावातील नागरिकांनी केले होते.
यावेळी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल वस्ताद सुरेश पंढरीनाथ बारणे यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ‘कुस्ती जीवन गौरव पुरस्कार २०१९’ देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते एचए तालीमचे खेळाडू पै. चेतन मारुती कलापुरे यांना उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आयोजक संदीप नखाते यांच्या वतीने आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर समितीचे उपाध्यक्ष हनुमंत गावडे तसेच ज्येष्ठ कोच किशोर नखाते यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आखाड्याचे पुजन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, भारत केसरी विजय गावडे, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, भारतीय कुस्ती संघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, कार्यालयीन सचिव ललीत लांडगे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक शत्रूघ्न काटे, अभिषेक बारणे, चंद्रकांत नखाते, नितीन लांडगे, सागर अंगोळकर, विठ्ठल भोईर, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, स्विकृत सदस्य महेश जगताप, संदिप गाडे, दिनेश यादव, विनोद तापकिर, कांतीलाल भूमकर, सुनिल कदम, गोपाळ माळेकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय भालेकर, पीसीएमटीचे माजी चेअरमन दिलीप बालवडकर, अंकुश राजवडे, श्रीराम कापसे, सुदाम नखाते, श्रीराम नखाते, मोरेश्वर नखाते, हरीश नखाते, काळूराम कवितके, सिनेट सदस्य संतोष ढोरे, कुष्णा तांबे, अरुण तांबे, अजय कदम, शिवराज तांबे आदींसह हजारो कुस्ती शौकिन उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी १२५ किलो वजन खुला गट स्पर्धेत माती विभागात अंतिम कुस्तीत आकुर्डीच्या पै. संकेत घाडगे याने पिंपळे निलखचा पै. रोहित माकर याला चितपट केले. तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी १२५ किलो वजन खुला गट स्पर्धेत अंतिम कुस्तीत निगडीच्या पै. संकेत चव्हाण याने भोसरीच्या पै. संतोष मांडेकरला ७ विरुध्द १ गुणांनी पराभूत करुन महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला.
या स्पर्धेचे आयोजन ‘ड’ प्रभाग स्विकृत सदस्य संदिप भानुदास नखाते यांनी पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, कार्याध्यक्ष आ. महेश लांडगे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, मुख्य संघटक धोंडिबा लांडगे, भारत केसरी विजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निमंत्रक हभप भानुदास नखाते, राष्ट्रीय कुस्ती पंच विजय नखाते, माजी स्विकृत नगरसेवक सखाराम नखाते, नंदकुमार नखाते, मारुती नखाते, प्रदिप नखाते, कुलदिप नखाते, शुभम नखाते तसेच समस्त ग्रामस्थ रहाटणीगाव यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.















