न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०१९) :- पिंपळे गुरव मधील संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त बहिरेपणा तपासण्यासाठी ऑडिओ मेट्रिक (कानाची तपासणी) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार होते. यावेळी तानाजी जवळकर, श्रीकृष्ण फिरके, सुनील शिंदे, पोपट चव्हाण, पुंडलिक तोरवणे, ए डी कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, चांदमल सिंघवी, मधुकर पाटील, मधुकर चौधरी, मोहन भोईटे, शिनगारे गुरुजी, सुरेश दिघे, पी के पाटील, दत्तात्रय पाटकर, धनेशकुमार पुरोहित, रोहित जाधव, श्यामराव लोहार आदी उपस्थित होते.
डॉ. योगेश काकडे व डॉ भूमिका काकडे यांनी आरोग्य शिबिरासाठी योगदान दिले. कराटे स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता राजवर्धन चौहान, पिंपरी चिंचवड माध्यशिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले योगेश भोसले यांचा सत्कार करण्यात आला. अरुण पवार यांच्या तर्फे शिबिरात तपासणी करून घेतलेल्या नागरिकांना श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात अरुण पवार म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद हे तरुणांना लाजवेल असे कार्य करीत आहेत. गेल्या तीन वर्षात संघाने उल्लेखनीय कार्य केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील शिंदे, सूत्रसंचालन सुभाषराव भापकर, तर आभार तोरवणे पाटील यांनी मानले.















