न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जानेवारी २०१९) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन उत्कृष्ट पाठ सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातील चार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
त्यात प्रथम क्रमांक ताथवडे येथील राजश्री शाहू शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थीनी रॅन्सी सॉईक हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिला भव्य चषक रोख रक्कम व प्रमाणपत्र प्राचार्य डॉ. दत्तात्रेय तापकीर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. दुसरा क्रमांक चिंचवड येथील प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची रश्मी शर्मा तर, तिसरा क्रमांक पुणे येथील आदर्श शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील तनया गोखले हिने मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक पुणे येथील एस.एन.डी.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सखी भडमकर व चिंचवड येथील जैन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थीनी रुद्रानी नाईक हिला मान मिळाला. त्यांना पुस्तक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, डॉ. सुवर्णा गायकवाड, समन्वयिका प्रा. अस्मिता यादव, परिक्षक पुणे येथील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सुरेश इसावे उपस्थित होत्या.
पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. दत्तात्रेय तापकीर पुढे म्हणाले, पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविताना पोटतिडकीने शिकवित होते. आता शिक्षक विज्ञान, इंग्रजी, गणित, इतिहास आदी विषयाच्या आशयाची निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. हा बदल जरी असला तरी विद्यार्थी हे लाभार्थी आहेत. याची जाणीव ठेवा. आज स्पर्धेत सहभाग घेणारे विद्यार्थी भावीकाळात शिक्षक होणार आहात. तुम्ही ज्या-ज्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविणार आहात, त्यावेळी विद्यार्थ्यांना वर्गात बसावयास वाटले पाहिजे. शिकविताना ताणतणाव न घेता शिकवता आले पाहिजे. शिक्षक शिकविताना अनेकवेळा त्याचे हात बोलतात, देहबोली महत्त्वाची आहे. विविध विषयाचे सादरीकरण वर्गात करताना शिक्षक म्हणून तुम्हाला आनंद व विद्यार्थ्यांना शिकण्यात रस निर्माण करता आला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अध्ययन होण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करणे सोपे जाईल. शिक्षणशास्त्र पदवी घेणार्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित करते, ही फारच कौतूकास्पद बाब असून सहभाग घेणार्या स्पर्धकांना देखील आपण कोठे कमी पडतो. याचे अचूक आकलन अशा स्पर्धांमुळे होण्यास मदतच होते.
प्रास्ताविकात प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम म्हणाल्या, आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा येथील विविध शाखेचे प्राध्यापकांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लक्ष द्यावे. यासाठी ज्या-ज्या आवश्यक उपाययोजना, नवनवीत कल्पना असतील. त्या प्रत्यक्षकृती रुपी करावे, असे मार्गदर्शन नेहमीच असते. अशा संकल्पामुळेच यंदा सलग तिसर्या वर्षी आंतरमहाविद्यालयीन शिक्षणशास्त्र पदवी घेणार्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट पाठ सादरीकरण स्पर्धाचे आयोजन करणे शक्य होत आहे. अशा स्पर्धांमुळे चांगले शिक्षण निर्माण व्हावे, उत्कृष्ठ पाठ निरीक्षण करण्याची त्यांना संधी उपलब्ध व्हावी, यासाठी नेहमीच ते आग्रही असतात.
स्पर्धेच्या प्रसंगी मोहननगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इ. ९ वी मधील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच येथील शिक्षणशास्त्र पदवी घेणार्या विद्यार्थ्यांसमोर स्पर्धकांनी आपले सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका उषा साकोरे व कुमिनल दरेकर यांनी केले. तर, आभार कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. अस्मिता यादव यांनी केले.


















