न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जानेवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिव्यांग बांधवांना ‘व्हिलचेअर’चे वाटप करण्यात आले. चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आश्रमाला जीवनावश्यक धान्यांचे वाटप करण्यात आले. मोफत वैद्यकीय तपासणी, प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकेचे अनावरण करण्यात आले.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. निगडीतील घरकूल अपंग सहाय्य संस्थेच्या ३० सभासदारांना व्हिलचेअर, वॉकर, कुबड्यांच्या सेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे, संस्थेचे दत्ता भोसले, संगीता जोशी, नगरसेवक अमित गावडे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विक्रम वाघमारे, अतुल भोंडवे, वैशाली मराठे उपस्थित होते. मित्र परिवार सोशल फाऊंडेशन आणि अमित गावडे युवा मंचाने कार्यक्रमाचे नियोजन केले.


















