न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे.
यासाठी महाराज ग्रुप गडसंवर्धन पि. चि. तर्फे रविवार दि.५ जानेवारी २०२० रोजी मावळ किल्ले तुंग गडावर गडसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. सर्वप्रथम गडावरील ध्वज बदलण्यात आला. शिववंदना घेऊन प्रवेशद्वार, पायऱ्या, तसेच जे अवशेष गवताखाली गेले होते ते साफ करण्यात आले. गडावरील सर्व कचरा गडाच्या खाली कचरा कुंडीत आणुन टाकण्यात आला.
यावेळी ग्रुपचे संस्थापक अक्षय नाळे, सुशील पोतदार, अतुल महाडिक, सुरज करांडे, शुभम देशमुख, परमेश्वर त्रिमले, शिवम खिल्लारी, ओमकार जाधव, सागर मोरे, अमित मालुसरे, मरगळ, कैलास सोनटक्के, राहुल ईबितदार, अतिश अगरक, कैलास चाकोरे, रुपेश पाटसकर, दिपक खंडगावे आदी ४० स्वयंसेवकांनी मोहिमेत सहभाग घेतला.















