न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२०) :- पक्षनेते व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मागील आठवड्यात खासगी जमीन वाटाघाटीसंबधी आयुक्तांकडे नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच शहरातील आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करून मिळकतकर भरणासंबधी चौकशीची देखील मागणी केली होती. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) होती.
सभेच्या सुरूवातीलाच माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी एकनाथ पवार यांचा निषेध करीत, नगरसेवक महापालिकेत चोर्या करायला येतात का? कोणते नगरसेवक चोर आहेत? त्यांची पवारांनी नावे जाहीर करावीत. अन्यथा, अकलेचे तारे तोडणार्या पवार यांच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार, असा इशारा दिला.
कोण वाटाघाटी करते? कोणाची थकीत बिले आहेत? पक्षनेते स्वतःचे अपयश लपविण्यासाठी पत्रके काढत आहेत. एकनाथ पवार यांनी सभागृहात येऊन माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली. दरम्यान, वादाच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते एकनाथ पवार आज सभेला गैरहजर होते.


















