न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शहरातील भोसरी, मोशी, चिखलीतील अनधिकृत फ्लेक्सवर गुरुवारी (दि. ९) रोजी कारवाई केली.
दरम्यान भोसरीतील जिजामाता उड्डाणपूल, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, धावडेवस्ती, मोशी भारत माता चौक, हवालदार चौक, नागेश्वर मंदिर चौक, देहू आळंदी रस्ता, लक्ष्मी चौक, जाधववाडी चौक, मोई चौक, डायमंड चौक, ताल चौक, चिखली भाजी मंडई परिसर, तळवडे रोड इत्यादी ठिकाणी १११ अनधिकृत फ्लेक्स निष्कासित केले.
तसेच अतिक्रमणे हटवली. सदर कारवाई पथक क्रमांक ३ व ५ पोलीस यांचे सहाय्याने केली, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.















