- रा. काँ. च्यावतीने कस्पटे वस्ती येथे जय भगवान गोयल यांचा पुतळा दहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. फक्त विरोधकच नाही तर सर्वसामान्यांकडूनही याप्रकरणी रोष व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पार्टी व जय भगवान गोयल यांच्या निषेधार्थ रविवारी (दि. १३) रोजी कस्पटे वस्ती वाकड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जय भगवान गोयल यांचा पुतळा दहन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर संपत कस्पटे, समीर कस्पटे, हिंदुराव कस्पटे, रोहित अत्रे, तानाजी अत्रे, प्रकाश पाले, रामचंद्र कदम, सुरेश कस्पटे, ॠषिकेश कस्पटे, राजेंद्र साबळे, सागर कस्पटे, विजय गवारे, शंभूराजे कस्पटे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे म्हणाले की, “भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे. मोदींची महाराजांशी तुलना करणाऱ्या मोदी भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली किती घृणा आहे हे यातून दाखवलं आहे. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आमच्या छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांनी अनाजी पंतांचा इतिहास आठवावा. अशा माथेफिरुंची पुन्हा गय केली जाणार नाही.












