न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ ड ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २५ व २६ येथील दत्तमंदिर रस्ता, वाकड येथे गुरुवार (दि. २३) रोजी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ४५ मी. रस्ता रुंदीकरणाने बाधित व महानगरपालिकेस हस्तांतरित केलेल्या जागेवर असलेले अनधिकृत अतिक्रमण पत्राशेड / टपरी / सीमाभिंत / ओट्टा इत्यादीवर कारवाई केली.
सदर कारवाईमध्ये २०५८८. ८२ चौ. फुट, असलेले ०४ पत्राशेड, १२ ओट्टा, ०३ टपरी, १ गेट, १ जिना, २५ बोर्ड, ०८ सीमाभिंत इत्यादीवर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ट अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने केली. सदर कारवाईस ८० पोलिस, ०३ जे. सी. बी., १ ट्रक व १८ मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने लागले.