- स्वावलंबी शिक्षण मॉडेलची गरज अधोरेखित; ‘विकसित भारत २०४७’ संकल्पनेवर भर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित भारतीय विद्यापीठ संघ (AIU) ची १०० वी वार्षिक महासभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. देशभरातील कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांच्या उपस्थितीत ‘विकसित भारत २०४७’ या विषयावर व्यापक चर्चा झाली.
समारोप प्रसंगी डॉ. अतुल कोठारी यांनी स्वावलंबी शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता अधोरेखित करत विद्यापीठांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा आधार घेत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे सांगितले. त्यांनी शिक्षणात नवोपक्रमासोबत मूल्याधिष्ठित दृष्टिकोन राखण्याचे महत्त्वही स्पष्ट केले.
कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी उच्च शिक्षणात गुणवत्ता, समावेशकता आणि नवोन्मेष यांवर आधारित सक्षम परिसंस्था उभारण्यावर भर दिला. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि संस्थात्मक सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन केले.
ही परिषद भारतीय उच्च शिक्षणासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.












