न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. २६) रोजी प्रजासत्ताक दिनापासूनपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात उद्घाटन कार्यक्रम पार पडला. पुण्यात सात आणि पिंपरी चिंचवडमध्ये चार ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा ’ हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान ७५ आणि कमाल १५० जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येईल. रोज दुपारी बारा ते दोन या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.












