न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- चिंचवड गावातील प्रसिद्ध व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व मेसर्स बी. जे. क्लॉथचे मालक बाबुलालजी जोगीदास मुथा (वय ८४) यांचे संथाराव्रत दरम्यान गुरुवारी (दि. २३) देहावसान झाले.
त्याच्या पश्चात दोन मुले व तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. बाबुलालजी मुथा हे श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सभासद होते. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर होते.












