न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- गरीब आणि गरजू नागरिकांना १० रुपयात शिवभोजन योजनेचे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उद्योगनगरीतील वायसीएम हॉस्पिटल उपहारगृह व वल्लभनगर एस. टी. स्टँड उपहारगृह येथे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अन्न नागरी पुरवठाचे नायब तहसीलदार दिनेश तावरे ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक योगेश बहल, मा. नगरसेवक धनंजय आल्हाट, मा. महापौर संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेविका मीनल यादव, नगरसेवक श्याम लांडे, नगरसेवक अमित गावडे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, सचिन सानप, कुणाल जगनाडे, अनिल सोमवंशी, सतीश मरळ, अमित शिंदे, प्रवीण पाटील, नीलेश हाके, फझल शेख, सुनील लांडे, रामदास वानखडे व सर्व पदाधिकारी उद्घाटनास उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांनी शिवभोजन योजनेचे शिल्पकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचे आभार मानले.











