न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- पिंपळे सौदागर परिसरातील वै. ह. भ. प. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त १९ रेजिमेंट मराठा बटालियन व भारत सरकार शौर्य पदक प्राप्त लष्करी अधिकरी भागवत गणपत शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
या वेळी संस्थापक जगन्नाथ काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, नारायण काटे, राजू गायकवाड, डॉ. हसबे किरण, बंडोपंत शिंदे, सचिव सोमनाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका विद्य संगीता पराळे, पर्यवेक्षिका सविता आंबेकर, क्रीडाशिक्षक राहुल ‘ कोरे , शिंदे सयनाजी , कार्तिकला – गायकवाड , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी झेंडा गीत सादर केले. विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख व पाहुण्यांनी त्यांच्या भाषणातून भारत – पाकिस्तान युद्धा दरम्यान झालेल्या घडामोडी व्यक्त केल्या. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्याला आले.
विद्यार्थी तन्मय पाटील, कविता सीरवी यांनी सूत्रसंचालन केले.