- शहर मनसेची आढावा बैठक नांदगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न – सचिन चिखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२०) :- राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या समर्थनार्थ मनसेच्या वतीने ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाही होण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.
बांगलादेश, पाकिस्तान आणि नायजेरियनमधून भारतात आलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात आणि एनआरसीच्या समर्थनार्थ मनसेच्या वतीने ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची आढावा बैठक रविवारी नांदगावकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली.
यावेळी मनसेचे नेते शिरिश सावंत, बाबू वागस्कर, पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी किशोर शिंदे, गणेश सातपुते, रंजीत शिरोळे, शहराध्यक्ष गटनेते सचिन चिखले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. ज्या नागरिकांना आपल्या देशाप्रती प्रेम आहे. त्या सर्व नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हाव असे आवाहन नांदगावकर यांनी केले आहे, अशी माहिती नगरसेवक व गटनेता, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.












