न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम एक मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
तसेच ठेकेदाराने तीन पाळीमध्ये काम करावे. तसेच अधिकाऱ्यांनी नियोजन करून दर १५ दिवसांनी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
निगडीत सुरु असलेल्या तीन मजली पुलाच्या कामाची पदाधिका-यांनी आज (सोमवारी) पाहणी केली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, अमित गावडे, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, शर्मिला बाबर, सह शहर अभियंता श्रीकांत सवने, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उपअभियंता विजय भोजने उपस्थित होते.












