न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेनल संपन्न झाले. त्याचे उद्घाटन पुणे येथील एस.पी.एम. संस्थेचे व विधी तज्ञ एस.के.जैन यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी सिने अभिनेत्री अस्मिता शेवाळे, २०१९ सालची मिस इंटरकॉन्टीनेंन्टल डॉ. सुफी सय्यद, बेटी बचाओ, बेटी पढाओ बँ्रड अॅब्मेसिटर सहिफा सय्यद, कमला शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, सचिव डॉ. दिपक शहा, मातोश्री शशिकला शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, डॉ. सचिन बोरगावे, डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. सविता कुर्हाडे, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हिस, लायन्स क्लबचे, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी जरा याद करो, कुरबाणी या धर्तीवर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची नाटिका विविध पारंपारिक वेशभूषेत साकारली. या नाटीकेत महात्मा गांधींजीची दांडी यात्रा, इंग्रजांचा भारतीयांवर झालेला अत्याचार, मिठाचा सत्याग्रह, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीयांचा विदेश कपड्यांवरील बहिष्कार, झाशीची राणी, मंगल पांडे, चंपारण्य सत्याग्रह, जालियनवाला बाग, १९४० चा भारत छोडो आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ, पंडीत जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, अॅड. महम्मद जिना, लोकमान्य टिळक या थोरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती आदी घटनाक्रम विद्यार्थ्यांनी साकारत शेवटी १९४७ साली भारत देश स्वातंत्र्याच्यावेळी भारत-पाकिस्तान फाळणी प्रसंग सादर केले. विद्यार्थ्यांचे कलागुण बघून पालकांनी उस्त्फूर्त देत, भारत माता की जय, या घोषणेने सारा परिसर दुमदुमुन गेले.
स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हिस यानी अहवाल वाचन केले. उपस्थितांना यावर्षी इ. १० वी निकाल १०० टक्के लागल्याचे आवर्जुन सांगितले. विधीतज्ञ एस.के.जैन, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, सचिव डॉ.दिपक शहा आदींच्या हस्ते शाळेतील कला, क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रातील गुणवंतांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन समन्वयिका खुशनुमा सय्यद यांनी केले तर, आभार उपमुख्याध्यापिका रेणूका दारवेकर यांनी मानले. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी अमृता कांबळे, कोरिओग्राफर रोहित कांबळे, दिनेश पटेल, याज्ञी पाठक, पिया यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्य स्टॉल उभारून १ लाख २१ हजार ६७० रुपये जमा केले होते. त्यात कमला शिक्षण संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिललिकीची जपवणूक करीत आर्थिक भर टाकून लोणावळा येथील आतवण गावात जिल्हा परिषदेची शाळेचे बांधकाम चालू आहे. त्या इमारतीसाठी लोणावळा येथील लायन्स क्लब ऑफ सुप्रीमोला १ लाख २५ हजारांचा धनादेश सुरेय्या वाडीवाला, श्रीराम कुबेर यांना प्रदान करण्यात आला. हांडेवाडी येथे वेश्यांसाठी सुधार काम करणार्या संस्थेला सुमारे २५ हजार रुपयांचे इलेक्ट्रिकल गिझर आदी जीवनाश्यक वस्तू जॉनीता स्वामी यांना देण्यात आला. खेड येथील रस्त्यावरील मुलांचे संगोपन करणार्या संस्थेला१० हजार रुपयांचा धनादेश प्रज्ञा जाधव यांना देण्यात आला. रवि गायकवाड याचा एक पाय निकामी झाला असून, त्याच्या उपचारासाठी लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष विजय अगरवाल यांना १० हजार रुपयांचे मदत दिली.