न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, नगरसचिव उल्हास जगताप, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते सिताराम
राठोड, बालाजी राठोड, रवि कांबळे, रवि गोरनिकवाडी, सुनिल राठोड, दिलिप आडे, रावसाहेब राठोड, इंदल राठोड, रमेश राठोड, अभिमान भोसले, विजय राठोड आदी उपस्थित होते.











