न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे २० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्याचे काम वेगाने सुरु आहे. लेव्हल थ्री ची आग लागल्याचं अग्निशमन दलाने म्हटलं आहे. म्हणजेच ही आग गंभीर स्वरुपाची आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.