न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्व समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती शक्ती समूह शिल्प, निगडी येथील उद्यानात शाहीर सुरेश सुर्यवंशी यांनी रणगाथा शौर्याची हा शाहीरीचा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे उद्धाटन अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसदस्य अमित गावडे, नगरसदस्या सुमन पवळे, शैलजा मोरे माजी नगरसदस्य मारूती भापकर, सहा. आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्व समिती चे जीवन बोराडे, सागर तापकीर, प्रतीक इंगळे, अभिषेक म्हसे, विनायक जगताप, दादासाहेब पाटील, नाना वारे, निलेश शिंदे, प्रविण पाटील, दत्ता शिंदे, ज्ञानेश्वर लोभे, सतेज परब, जयराम नानेकर, हनुमान डक, किरण जंजाळ, शाम बोराडे, अजय पाताडे, विनायक जाधव, विष्णु नानेकर, अजय वर्पे, स्वप्नील शिंदे, भावेश काचा, शाम बोराडे तसेच मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी शाहीर सुरेश सुर्यवंशी यांनी गायलेल्या राजमाता जिजाऊ यांनी घडविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पोवाडयाला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.















