न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- कासारसाई ( ता . मुळशी ) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी माजी खासदार, कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला पुन्हा एकहाती सत्ता दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ . आर . एस . धोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण साकोरे, श्रीकांत श्रीखंडे , शाहूराज हिरे , हर्षिततावरे , बी . एस . घुगे , दिग्विजय राठोड , संतोष शिरसेटवार यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
त्यासाठी दीडशे कर्मचारी पन्नास टेबलवर कार्यरत होते. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत ताराबाई सोनवणे ( ८७७३ ) , शुभांगी गायकवाड ९७८२ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी बंडखोर रुपाली दाभाडे ( १४१७५ ) यांचा पराभव केला. येथे ६०८ मते बाद झाली.
भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या गटात नवले पॅनलचे बाळकृष्ण कोळेकर ( ९८१५ ) विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलेले सुरेश जाधव यांना २२५ मते पडली. पॅनलला पाठिंबा दिलेले शिवाजी कोळेकर यांना ४६१ मते पडली. येथे १०३६ मते बाद झाली.
इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये चेतन भुजबळ ( ९७४८ ) विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध अरूण लिंभारे यांना ११४३ मते मिळाली. अनुसूचित जाती , जमाती गटात बाबू गायकवाड ९६३४ मतांनी विजयी झाले. त्यांनी सखाराम गायकवाड ( ९७२ ) यांनी पराभूत केले.