न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- सालाबादप्रमाणे याही वर्षी चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनासाठी आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, विभागप्रमुख अमोल भागवत, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, नगरसेवक जितु यादव, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे, सोमनाथ मोरे, तसेच कॉलेजच्या समन्वयक कु. प्रतिक्षा डफळ, संतोष घाडगे, अतुल पुंडे, सहायक शिक्षक सौरभ भागवत, किरण वाघमारे, योगेश राठोड यांनी उपस्थिती दर्शविली.
शिवजयंती निमित्त आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे शिव-चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चिखली विभागातील नागेश्वर विद्यालय, गणेश इंटरनेशनल स्कूल, दादा महाराज नाटेकर विद्यालय ( गुरुकुल ), मनपा सोनावणे वस्ती शाळा क्र. ९३, विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल, मातोश्री विद्यालय, देवगिरी इंग्लिश मीडियम स्कूल, कोब्रा मार्शल आर्ट्स इ. शाळेमधील जवळ जवळ ५५० विद्यार्थ्यानी यात सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. सर्व विद्यार्थी, पालक व प्रमुख पाहुणे यांनी त्या प्रदर्शनाचा आनंदही लुटला. तसेच यामध्ये शालांतरीय प्रथम तीन क्रमांक काढून त्याना गौरविन्यात आले व सहभागी सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानी महाराजांच्या चरित्रावर आधारित सुंदर असे पोवाड़े तसेच भाषणे सादर करुन शिवाजी महाराजांविषयीचा आदर व्यक्त केला.
आयआयबीएम कॉलेजचे संचालक राम रैना यांनी शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे संबोधले. तसेच नगरससेविका स्विनल म्हेत्रे यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत शिव विचारांची प्रामुख्याने गरज आहे, असे सांगितले. विभागप्रमुख अमोल भागवत यांनी शिव-चित्रकला स्पर्धेबद्दल व प्रदर्शनाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
छ. शिवाजी महारजांच्या जयंतीनिमित्त हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानी कॉलेजपासून ते चिखली गावठानपर्यंत ढ़ोल – ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून चिखली भागातील ग्रामस्थांमध्ये कोरोना आजारबाबत जनजागृती केली.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन समन्वयक कु. प्रतिक्षा डफळ, संतोष घाडगे व अतुल पुंडे यांनी तर, कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी सर्वांचे आभार मानले.











