न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ह.भ.प.जयराम देवकर यांचा हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिक लक्ष्मण गडेकर, विलास साळुंखे, प्रमोद नवले, प्रदिप करडे, अर्जुन कांबळे, गणपती पाटील आदी उपस्थित होते. संदेश नवले म्हणाले की, शिवाजी महाराजांची विचारधारा सोबत घेऊन समाजात समाज जागृती निर्माण केली पाहिजे.


















