न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशन आयोजित विविध कला व क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ क्रिकेट स्पर्धेने झाला. या स्पर्धेत चार टीम चे माध्यमातून ४४ वकील मित्रांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेची विजेता ‘बी’ टीम ठरली. स्पर्धेचे उद्घाटन माजी अध्यक्ष अॅड. विजय शिंदे यांचे हस्ते झाले. त्यावेळी माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. अनिल तेजवाणी, अॅड. विलास कुटे, अॅड. राजेश पुणेकर, अॅड. सुनील कडूसकर, बार कौन्सिल शिस्तपालन समितीचे माजी सदस्य अॅड. अतिश लांडगे, अॅड. बाळासाहेब रणपिसे, अॅड. गोरखनाथ झोळ, सॉलिसिटर विकास पोटघन, अॅड. योगेश थांबा, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. अमित डांगे, अॅड.नचिकेत देवकर, अॅड. चेतन जोशी, अॅड. योगेश गौरव वाळुंज, अॅड. तुषार नवले, अॅड. प्रताप कडूस, अॅड. अनिल शिंदे, अॅड. कुलदीप बकाल, अॅड. महेश टेमगीरे, अॅड. गोरख कुंभार, अॅड. प्रतिक जगताप, माजी अध्यक्ष महेश नागरगोजे, अॅड. योगेश मलेवडी, अॅड. नितीन शिंदे, अॅड. कैलास भालेकर आदी वकील मंडळी उपस्थित होती.
या सर्वांनी क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. क्रिकेट स्पर्धेसाठी उपाध्यक्ष अॅड. अतुल अडसरे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना सचिव अॅड. हर्षद नढे पाटील यांनी आणि इतर वकिलांनी मोलाची साथ दिली. तसेच सदस्य अॅड. अनिल पवार व अॅड. विश्वेश्वर काळजे, अॅड. राजेश रणपिसे यांनी सक्रिय सहभाग नोदवून स्पर्धेत रंगत आणली.












