न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२०) :- मध्यरात्री रात्री १.५० च्या सुमारास मारुंजी गावातील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेले फ्लेवर्स चायनीज शॉप,आदेश्वर शीट कव्हर हे दोन शॉप यांना भीषण आग लागली होती. प्रथम शीट कव्हरच्या दुकानामधून आग पसरत चायनीज शॉपला पण आग लागली. पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्यामुळे चायनीज शॉप मधील तीन एलपीजी (LPG) सिलेंडर आगीमधून बाहेर काढण्यात आले.
अग्निशमन दलाची मदत लवकर मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या सात ते आठ दुकानांना आगीपासून संरक्षण करण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.












