- शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- संपुर्ण जगभरात थैमान घातलेला नोव्हेल करोना विषाणु ( Novel corona virus 2019 – nCov ) सध्या भारतात वेगाने पसरत आहे व हया आजाराची लागण आता पुण्यामध्ये देखील काही नागरिकांना झाली असल्याचे प्रसार माध्यमांमधून समजत आहे. मा. आयुक्त साहेब, मा. वैद्यकिय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी आपल्या विभागामार्फत कोरोना आजार आटोक्यात येईपर्यंत संपुर्ण शहरभर कोरोनाबाबत काळजी घेणेबाबतची माहीतीपत्रक छापुन प्रत्येक घरो घरी वाटप करावेत व जाहीरातीमध्ये प्रसिद्ध करत रहावेत.
सध्या मास्कचे व सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने मास्कची किंमत मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत. तरी पिं . चिं . म . न . पा . मार्फत संपुर्ण म . न . पा . च्या दवाखान्यांमध्ये एन ९५ किंवा तीन घडीचा सर्जीकल मास्कचे वाटप, सॅनिटायझर अल्प दरात करण्यात यावे. बाहेर देशातुन किंवा बाहेरगावातुन येणा – या नागरिकांची वैद्यकिय तपासणी करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी व संपुर्ण शहरामध्ये सतत औषध फवारणी करत रहावी. सर्व कामाच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती करावी व सध्या शालेय परिक्षांचे वातावरण असुन शहरातील सर्व शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये व विद्यापिठांमधील वर्गामध्ये परिक्षा सुरु होण्यापूर्वी व परिक्षा झाल्यानंतर औषध फवारणी करत रहावी.
शहरातील कामांच्या ठिकाणी होत असलेले बायोमेट्रीक थम्ब इंम्प्रेशनचा वापर करण्यावर निर्बध घालावे व संपुर्ण शहरातील कार्यालयांमध्ये नियमित साफ सफाई करण्याचे सुचना यावेत. सध्या उन्हाळा असल्याने बरेच नागरिक स्विमिंग करिता शहरात असलेले नदी , धरण व म . न . पा . चे स्विमिंग टॅक वर पोहण्याकरिता जातात. त्यामुळे शहरातील नदी, धरणावर पोहण्यास मज्जाव करण्यात यावा व स्विमिंग टॅक मध्ये औषधे टाकून तलाव कायम स्वच्छ व निरोगी ठेवण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेचे शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे यांनी महापालिका आयुक्तांकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.















