न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- रावेत येथील जलउपसा केंद्र येथे पवना नदीमधील व इनटेक चॅनेलमधील गाळ व कचरा काढणेकामी येणा-या ३६ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
आज झालेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त (२) अजित पवार यांचे हस्ते नवनियुक्त सभापती संतोष लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, भिमाबाई फुगे, पोर्णिमा सोनावणे, सुलक्षणा धर, सुवर्णा बुर्डे या नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.















