न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च. २०२०) :- भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर वल्लभनगर बसस्थानकाजवळील आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास देखील महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले.
यावेळी फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.















