न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च. २०२०) :- सद्यस्थितीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये करोना विलगीकरण कक्षामध्ये १० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासोबत पिं. चिं. मनपाचे नविन भोसरी रुग्णालय येथे २० खाटांचे आयसोलशन ( Isolation ) कक्ष व ४० खाटांचे क्वॉरटाईन ( Quarantine ) कक्ष तयार करण्यात येत आहेत.
याबाबत आयुक्त यांनी आज (दि. १३ / ०३ / २०२०) रोजी नविन भोसरी रुग्णालय येथे समक्ष भेट देवून पाहणी केली व त्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजाबाबत समक्ष सुचना दिल्या.
या पार्श्वभूमीवर पिं. चिं. मनपामार्फत हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. सामान्य नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांचे करोना आजारा संबधित कोणतेही प्रश्न असलेस सदर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभाग तथा सर्व रुग्णालयामध्ये करोना विषाणु आजाराविषयी माहिती देणेकरीता अतिरीक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी व प्रभारी वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.















