- पार्थ पवार सोशल फाउंडेशन च्या वतीने करोनाबाबत जनजागृती व मास्कचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- करोना व्हायरसचा फैलाव वाढल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालय, नाट्यग्रह, चित्रपटगृह, मॉल्स, ऐतिहासिक वास्तू ,गार्डन, जलतरण तलाव आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पार्थ पवार सोशल फाउंडेशन च्या वतीने सोमवारी (दि. १६) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गर्दीच्या ५० पेक्षा जास्त भागात जाऊन मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, उपाध्यक्ष निखील दळवेल, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे, उपाध्यक्ष हर्षवर्धन भोईर, उपाध्यक्ष मयूर जाधव, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, प्रतीक साळुंके, अक्षय माछरे,अशोक भडकुंबे, मंथन लोणकर,दिनेश पटेल ,कुणाल देशमुख, रवी लिंबोळे, मयूर थोरवे, सर्फराज शेख , मजर खान आदी युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शहराध्यक्ष विशाल वाकडकर म्हणाले की, शहरातील अनेक लोकवस्तीमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी जपत, पार्थ पवार सोशल फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात आली. त्यांच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन करोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना मास्क व हात धुण्यासाठी लिक्विड देण्यात आले. तसेच करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दी टाळण्यात यावी, असे आवाहन केले.


















