न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- जगभरात पसरत असलेला महाभयंकर कोरोना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी पार्थ पवार सोशल फौंडेशनच्या वतीने रहाटणीतील प्रभाग क्रमांक २७ मध्ये मा. नगरसेवक कैलासभाऊ थोपटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक कैलासभाऊ थोपटे यांनी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी मा. नगरसेवक कैलासभाऊ थोपटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिचि शहर उपाध्यक्ष कुणाल थोपटे, दत्तात्रय कारभारी, प्रदीप चौथरे, निलेश कट्टे पाटील, अक्षय शेंडे, राहुल जगताप, प्रमोद कुंजीर, पंकज शिंदे, शुभम जरे पाटील, आकाश आचारी, रौनक शेख, दत्तात्रय पोतदार, हेमंत कुदळे, विजय भंडारी उपस्थित होते.


















