न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालय व मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर आणि पुणे जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांनी केलेल्या आवाहनामुळे च-होली, वडमुखवाडी येथील पुणे – आळंदी रस्त्यावरील श्री साई मंदीर आजपासून पुढील आदेश मिळेपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. असे पत्र श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. ‘श्रीं’ चे नित्य पूजाविधी मंदीरातील पुरोहित नेहमीप्रमाणे करतील. असे नेलगे यांनी सांगितले आहे.















