न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२०) :- पुण्यात एका महिलेला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पुण्यातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. संबंधित महिला काही दिवसांपूर्वीच परदेश दौऱ्यावरून आल्याची माहितीही मिळाली आहे.
पुण्यात एक महिला करोना बाधित रुग्ण आढळल्या असून पुण्यात करोनाच्या रूग्णांची संख्या १८ झाली झाली. संबधित महिला ही १४ मार्च रोजी नेदरलँड आणि फ्रान्सचा प्रवास करून आला होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.















