न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- देशासह महाराष्ट्रात करोनामुळे भयावह परिस्थिती आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लागणारी प्रतिबंधात्मक साधनं सामग्री स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
सॅनिटायझर तसेच मास्क स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा रुग्णालये, महापालिका दवाखाने आदी ठिकाणी मोफत उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे आद्य कर्तव्य आहे.
राज्य शासनाने करोनावर मात करण्यासाठी सर्वसामान्य व गरीब नागरिकांना परडवेल अशा दरात सॅनिटायजर व मास्क तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.













